राजकारण

डिझायनर प्रकरणावरून प्रियांका चतुर्वेदींनी डिवचले; अमृता फडणवीसांनी काढली थेट औकात

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना एका डिझायनर महिलेने एक कोटी रुपयांच्या लाच देण्याची ऑफर दिली होती. यावरुन सारखा त्रास दिला जात असल्याने अमृता फडणवीस यांनी डिझायनर महिलेच्या विरोधात मलबार हिल पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. डिझायनर प्रकरणावरून ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदींनी फडणवीसांना डिवचले आहे. यावर उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी चतुर्वेदी यांची थेट औकात काढली आहे.

काय म्हणाल्या प्रियांका चतुर्वेदी?

गुन्हेगाराच्या मुलीला प्रत्यक्ष उपमुख्यमंत्र्यांच्या घरात प्रवेश मिळतो. आणि पाच वर्षांहून अधिक काळ त्यांच्या पत्नीची मैत्रिण राहते. बायकोला दागिने, डिझायनर कपडे (प्रमोशनसाठी) देते. तिच्या गाडीत तिच्यासोबत फिरते. तरीही त्यांची मैत्री कायम आहे. आता व्हिडिओचे आरोप होत आहेत. पंतप्रधान मोदीजी हे महाराष्ट्रात काय सुरु आहे. परंतु, आता उपमुख्यमंत्री म्हणतात हे षडयंत्र आहे. गृहमंत्री कोण आहेत? तक्रार करणारा पक्ष कोण? या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हायला नको का, असे प्रश्न प्रियांका चतुर्वेदींनी उपस्थित केले आहेत. येथे जर विरोधी पक्षनेता असता तर हेच उपमुख्यमंत्री भ्रष्टाचार, चुकीचे काम, मीडियाचा आक्रोश, ईडी उड्या मारत, सीबीआय दाखल, एसआयटी गठित करत ओरडत राहिले असते, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

अमृता फडणवीस यांचे चतुर्वेदींना प्रत्युत्तर

मॅडम चतुर - आधी तुम्ही खोटा दावा केला होता की, मी Axis बँकेला फायदा करून दिला आणि आता तुम्ही माझ्या प्रामाणिकपणाला आव्हान देत आहात? अर्थात - तुमचा विश्वास संपादन केल्यावर, जर कोणी-पैसे देऊन केसेस बंद करण्यासाठी तुमच्याशी संपर्क साधला असता तर तुम्ही अशा व्यक्तीला तुमच्या मालकाद्वारे मदत केली असती - तीच तुमची औक़ात आहे.

मला माहीत आहे की, तुमची औक़ात म्हणजे मास्टर्स बदलणे आणि प्रामाणिक आणि स्वतंत्र महिलांना खाली खेचणे. मिस चतुर, तुम्हाला स्वतंत्र तपासासाठी नाक खुपसण्याची काय गरज होती? मी स्वतः याची मागणी करत आहे. जेणेकरून या फसवणुकीमागील खऱ्या चेहऱ्यांसह सत्य उजेडात येऊ द्या, असं अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अमृता फडणवीस लाच आणि धमकी प्रकरणी आरोपी अनिक्षा जयसिंघानीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. यानंतर आता अनिल जयसिंघांनीचा शोध सुरु आहे. अनिल जयसिंघांनीचं राजकीय कनेक्शन असल्याची माहिती समजत आहे. याप्रकरणी 4 विशेष पथक नेमण्यात आली आहेत.

काँग्रेसमध्ये नाराज असलेले काँग्रेस नेते आबा बागुल आजपासून रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारात सक्रिय

Sanjay Raut : फडणवीस लवंगी फटाक्याइतकाही स्फोट करु शकत नाहीत

Sanjay Raut : निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा ?

किरण सामंत विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

उज्जवल निकम आज राज ठाकरे यांची भेट घेणार