राजकारण

कोकणातील रिफायनरी प्रकल्प मिळावा म्हणून पाकिस्तान करतोयं प्रयत्न; शेलारांचा दावा, ठाकरेंनी केली मदत?

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : कोकणातील बारसू रिफायनरीला ग्रामस्थांनी विरोध करत मोठे आंदोलन केले होते. यादरम्यान आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. याविरोधात राजकीय वर्तुळातून शिंदे-फडणवीस सरकारला घेरत रिफायनरीला विरोध दर्शवला होता. यानंतर आता पुन्हा एकदा बारसूतील रिफायनरी प्रकल्प चर्चेत आले आहे. भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत मोठा दावा केला आहे. नाणार येथे होणारा देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प मिळावा म्हणून पाकिस्तान प्रयत्न करीत असल्याचा दावा शेलारांनी केला आहे.

कोकणातील नाणार येथे होणारा देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आपल्याला मिळावा म्हणून पाकिस्तान प्रयत्न करीत आहे. या प्रकल्पात सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या सौदी अराम्कोने या तेल कंपनीने आता पाकिस्तानातील ग्वादर शहराची निवड केली आहे. १० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर पाकिस्तान व सौदी अरेबियाने स्वाक्षरी केल्याची बातमी नवशक्ति या वर्तमानपत्रात आली आहे, असे आशिष शेलार यांनी सांगितले.

तर, गेली सहा वर्षे नाणार येथे रिफायनरीला विरोध करणाऱ्या उबाठाने कोकण, महाराष्ट्र आणि देशाचे कोट्यावधीचे नुकसान केले? प्रकल्प भारताला मिळू नये म्हणून ज्या आंतरराष्ट्रीय शक्ती काम करतात त्या नाणार विरोधी आंदोलनात सहभागी तर नव्हत्या? देश विरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींशी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची हातमिळवणी तर नव्हती? उबाठाने नाणारला विरोध करुन सरळ सरळ पाकिस्तानला मदत केली? असे मोठे आरोपही शेलारांनी ठाकरे गटावर केला आहे.

Anand Dave : मोदींना जिरेटोप घालण्याची हिम्मतच कशी? आनंद दवेंचा प्रफुल्ल पटेल यांना सवाल

NCERT Recruitment 2024: एनसीईआरटीमध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी...

अमरावती पालिकेच्या कर्मचाऱ्यांचं दोन दिवसांपासून कामबंद आंदोलन

Konkan: कोकण पदवीधर मतदारसंघ काँग्रेसकडे जाणार?

PM Narendra Modi : मुंबईतील उमेदवारांसाठी मोदी मैदानात,दिंडोरी, कल्याणमध्ये होणार सभा