राजकारण

येत्या 6-8 महिन्यात समृद्धी महामार्ग पूर्ण होईल; फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Published by : Shweta Shigvan-Kavankar

शिर्डी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आले. यामुळे नागपूर ते नाशिकचा पल्ला आता सहा तासांत होणार पार आहे. यावेळी फडणवीसांनी उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ठाकरे, पवारांनी सभा घेऊन समृद्धी महामार्गाला विरोध केला. मात्र, एकनाथ शिंदेंनी समृद्धी महामार्गासाठी प्रयत्न केले असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.

महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यांचे उदघाटन आपण लोकप्रिय आणि धडाडीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केलं. मी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आभार मानतो की आपण समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यांचे आज उदघाटन झाले. येत्या ७-८ महिन्यात संपूर्ण महामार्ग तयार होईल. समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा मुंबईपर्यंत जाणार, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.

मी सगळ्या खासदारांना बैठक घेऊन पीपीटी दाखवून माहिती दिली होती. सगळ्या संपादकांची भेट घेऊन मदतीचं आवाहन केलं होतं. भूसंपादनासाठी दर दिला होता. अनेकांनी याला विरोध केला, तेव्हा सोबत असलेले उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरमध्ये सभा घेतली आणि महामार्ग होऊ देणार नाही असं सांगितलं. तर, शरद पवार यांनी देखील हे शक्य नसल्याच सांगितलं. त्याच गावातील लोकांनी सर्वात आधी जमिन दिली. ९ महिन्यात ही जमिन भूसंपादन करण्याचे काम केले, असे त्यांनी सांगितले आहे.

तसेच, नागपूर-गोवा हा महामार्ग तयार झाल्याने मराठवाड्याचा खूप विकास होईल, चित्र बदलेल. आम्ही फायली अडवणारे आणि त्यावर बसणारे आम्ही नाही, असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

दरम्यान, समृध्दी महामार्गावर वाढत्या अपघातांबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेक अपघात झाले आहेत. परंतु, लवकरच येथे ट्रॅफिक मॅनेजमेंट होणार आहे. आपण आपल्या गाड्यांचा स्पीड १५० च्या वर ठेवू नका. आपल्याला १२० स्पीडची परवानगी आहे. पण, त्याहून स्पीड कमी ठेवा. आपल्या गाड्या बऱ्याच जुन्या आहेत. आपला जीव अधिक महत्वाचा आहे, स्पीड कमी करा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

"उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपद हिरावून घेतलं, म्हणून..." कणकवलीत नारायण राणेंच्या सभेत 'राज'गर्जना

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

टी-२० वर्ल्डकपमध्ये 'इॅम्पॅक्ट प्लेयर'चा नियम नाही, दिग्गज खेळाडू म्हणाला, "कर्णधाराची वेगळी रणनीती..."

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण