Uddhav Thackeray | Nitesh Rane
Uddhav Thackeray | Nitesh Rane Team Lokshahi
राजकारण

बॅाम्बस्फोटातील आरोपींचे समर्थन करणाऱ्यांसोबत मुख्यमंत्री झाले अन् आता...; नितेश राणे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यात राजकीय वातावरण तापलेले असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांना एकत्र आणण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात नवे समीकरण पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावरुन भाजप नेते नितेश राणे यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना भेटण्याची इच्छा होती. उद्धव ठाकरे हे सिंहाचे पुत्र आहेत. उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल, अशी आशा आहे. देशातील अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. हे नाते आम्ही पुढे नेऊ, असे अरविंद केजरीवाल यांनी भेटीत म्हंटले होते. भाजप फक्त गुंडगिरी करतो. सगळ्या देशाला गहाण ठेवलं जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी ट्विटरवरुन उध्दव ठाकरेंवर टीका केली आहे. आधी मुंबई बॅाम्बस्फोटातील आरोपींचे समर्थन करणाऱ्यांसोबत मुख्यमंत्री झाले. आता खलिस्तानवाद्यांचं समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांला भेटतात. यावरून हेच सिद्ध होते जन्माने संपत्तीत वारसा मिळतो. पण, आमचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा मिळवता येत नाही, असा जोरदार टीका नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेसला सोबत घेऊन आघाडी कशी मजबूत करता येईल यावर चर्चा झाल्याचे सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे मार्चच्या अखेरीस उद्धव ठाकरे मुंबईत विरोधी पक्षनेत्यांची मोठी बैठक आयोजित करण्याच्या तयारीत आहेत.

कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यातून PM मोदींचा 'मातोश्री'वर निशाणा; म्हणाले, आज बाळासाहेब असते, तर..."

उद्गीरमध्ये प्रियांका गांधींचा PM मोदींवर हल्लाबोल, म्हणाल्या; "पैशांच्या जोरावर महाराष्ट्रातील आमदारांना..."

Onion Export: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; केंद्राकडून कांदा निर्यातीला अखेर परवानगी

कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात PM मोदींची तोफ धडाडणार, फडणवीस म्हणाले; "कोल्हापूर असो किंवा महाराष्ट्रातील..."

'इंडिया' आघाडीवर फडणवीसांचं पुन्हा शरसंधान, कडेगावात म्हणाले, "राहुल गांधी, शरद पवार यांना..."