Rahul gandhi
Rahul gandhi  Team Lokshahi
राजकारण

नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी ईडी कार्यलयात, काँग्रेसचे देशभर आंदोलन

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Hearald Case) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नव्याने समन्स बजावले होते. यानुसार राहुल गांधी चौकशीसाठी आज ईडीसमोर हजर झाले आहेत. दरम्यान, राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते दिल्लीत दाखल झाले असून आंदोलन करत आहेत.

नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या आरोपांसंदर्भात कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने समन्स बजावले होते. परंतु, सोनिया गांधी यांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून त्यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात भरती केले आहे. यामुळे त्या ईडीसमोर हजर राहू शकल्या नाही. तर राहुल गांधी चौकशीसाठी आज ईडीसमोर हजर झाले आहेत.

तर, राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसतर्फे आज देशभरातील ईडीच्या २५ कार्यालयांबाहेर निदर्शने केली जाणार आहेत. सूडभावनेने केल्या जाणाऱ्या कारवाईचा निषेध करण्यात येणार आहे. तर अनेक कार्यकर्ते दिल्लीत दाखल झाले असून मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाही. पण, शांततेत मोर्चा काढण्यावर कार्यकर्ते ठाम आहेत. व राहुल गांधींवरील ईडी नोटीसीविरोधात दिल्लीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी केली आहे ‘राहुल झुकेगा नही, सत्य झुकेगा नही’, 'राहुल गांधी, आम्ही तुमच्यासोबत आहोत' अशा आशयाचे सर्वत्र पोस्टर लावण्यात आले आहेत. तसेच, राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत असताना दिल्ली पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले.

प्रकरण नेमकं काय ?

नॅशनल हेराल्ड' हे वर्तमानपत्र पंडित जवाहरलाल नेहरु (Jawaharlal Nehru) यांनी सुरु केलं होतं. हे काँग्रेसचं मुखपत्र समजलं जायचं. काही काळातच हे वर्तमानपत्र बंद पडलं. मात्र, 2012 मध्ये सोनिया आणि राहुल गांधी यांच्या 'यंग इंडिया' या कंपनीने या वर्तमानपत्राचे हक्क पुन्हा विकत घेतले. मात्र, हे सुरु करण्यात आलं नव्हतं. नॅशनल हेराल्ड प्रकरणात 55 कोटींचा गैरव्यवहार झाला होता. याबाबत सुब्रमण्यम स्वामी यांनी आरोप केला होता. त्यानंतर 2012 मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी एक याचिका दाखल करून काँग्रेस नेत्यांवर फसवणुकीचे आरोप केले होते.

2008 मध्ये एजेएलची सर्व प्रकाशने बंद करण्यात आली होती. तसेच या एजेएल कंपनीवर 90 कोटींचं कर्जही झालं होतं. त्यानंतर काँग्रेने यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड नावाने एक नवी अव्यवसायिक कंपनीची निर्मिती केली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासहीत मोतीलाल व्होरा, सुमन दुबे, ऑस्कर फर्नांडिस आणि सॅम पित्रौदा आदी नेते या कंपनीत संचालक होते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे या कंपनीचे 76 टक्के शेअर होते. तर इतरांकडे 24 टक्के शेअर होते. काँग्रेस पक्षाने या कंपनीला 90 कोटींच कर्जही दिलं होतं. या कंपनीने एजेएलचं अधिग्रहन केलं होतं.

IPL 2024 : हैदराबाद आणि गुजरातचा सामना रद्द; काय आहे प्ले ऑफचं समीकरण? 'हा' संघ मारणार बाजी

"छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल, तर..."; अमोल कोल्हेंनी भाजपवर डागली तोफ

देश तोडण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला अमित शहांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "भारताचं विभाजन..."

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...