Satyajeet Tambe
Satyajeet Tambe Team Lokshahi
राजकारण

शिंदे गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण; सत्यजित तांबेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

संतोष आवारे | अहमदनगर : अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या आहे. यावेळी एकनाथ शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव मिळाल्यानंतर सत्यजित तांबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा झालेला निर्णय ही तांत्रिक बाब असल्याचं सत्यजित तांबे यांनी म्हटलंय.

तर एका बाजूला पक्षाची घटना तर दुसऱ्या बाजूला लोकांचा पाठिंबा त्यातून निवडणूक आयोगाने अतिशय तांत्रिक पद्धतीने निर्णय दिला असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले आहे. तर हा निर्णय समजून घेणे आणि त्याच्यावर अभ्यास करणे हा कायदे पंडितांसाठी अभ्यासाचा विषय असून फार किचकट कायदेशीर प्रक्रियेतून झालेला निर्णय असल्याचं त्यांनी म्हटलंय.

लवकरच खासदार सुजय विखे यांची भेट घेणार असल्याचं सत्यजित तांबे यांनी सांगितले असून सुजय विखे सध्या परदेशात असून ते इकडे आल्यानंतर त्यांना देखील भेटणार असल्याचं तांबे यांनी म्हटलंय. तर विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे. त्यासाठी रोजच राजकारण केलं पाहिजे असं नाही, अस स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, आम्ही सर्वांनाच मदत करत असतो. तर जसजशी परिस्थिती निर्माण होईल. तसं तसं निर्णय घेऊ, असं सूचक वक्तव्य देखील त्यांनी केले आहे.

आमदार सचिन तांबे हे राजकीय आणि आर्थिक साक्षरता या दोन विषयावर जनजागृतीसाठी राज्यभर दौरा करणार आहे. राजकीय साक्षरता हा आपल्या देशातील सर्वात महत्त्वाचा विषय असून चांगल्या लोकांच्या पाठीशी कसं निवडायचं त्यांना कशी संधी द्यायची या संदर्भात योग्य विचार करून मतदान करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटलंय. आम्ही राज्यभर फिरून राजकीय साक्षरता आणि आर्थिक साक्षरता या दोन विषयावर जनजागृती करणारा असल्याचं सत्यजित तांबे यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar: मतदानाच्या टक्केवारीबाबत शरद पवारांकडून चिंता व्यक्त

...म्हणून १९९९ ला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Nilesh Rane On Vinayak Raut: माजी खासदार निलेश राणेंची विनायक राऊतांवर टीका

महायुतीसह मविआमध्ये उमेदवारी अर्जासाठी लगबग

Shrikant Shinde: "राज ठाकरेंचे विचार हे शिवसेनेचे विचार"