Sushma Andhare
Sushma Andhare  Team Lokshahi
राजकारण

विभक्त पतीच्या शिंदे गट प्रवेशावर अंधारेंचे रोखठोक वक्तव्य; म्हणाल्या, त्यांचे नेमके काय चालले...

Published by : Sagar Pradhan

राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व गोंधळ घडत असताना, शिवसेना(ठाकरे गट) आणि शिंदे गटातील रस्सीखेच अद्यापही सुरु आहे. दुसरीकडे मात्र, ठाकरे गटात आजही नेत्यांची गळती सुरु आहे. नुकताच खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सुषमा अंधारे बॅकफूटवर येतील असं सांगितलं जात आहे. मात्र, हे सर्व दावे सुषमा अंधारे यांनी फेटाळून लावले आहेत. त्यावरच आज सुषमा अंधारे पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

विभक्त पती वैजनाथ वाघमारे हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यावरच बोलताना अंधारे म्हणाल्या की, जर गेली चार पाच वर्ष मी त्यांच्यापासून विभक्त आहे, तर व्यक्ती म्हणून त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. मी त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा देईल. ते राजकारणात होते की नाही मला माहीत नाही. त्यांचे नेमके काय चालले होते हेही मला माहीत नाही. प्रत्येकाचे वैयक्तिक आयुष्य असते. प्रत्येकाचा भूतकाळ असतो. तो कुरतडण्याचं कारण नाही. भावना गवळी शिंदे गटात आहेत. त्यांचे पती कॅप्टन सुर्वे आमच्या पक्षात आहे. गजानन कीर्तिकर शिंदे गटात आहेत. तर त्यांचे चिरंजीव आमच्या पक्षात आहेत. त्यामुळे या टॅक्टिस केवळ राजकीय टॅक्टिस म्हणून पाहते, असे स्पष्टीकरण सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावर दिले आहे.

विभक्त पती वाघमारे हे तुमच्याबद्दल गौप्यस्फोट करणार आहेत. असा सवाल पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यावर उत्तर देतांना अंधारे म्हणाल्या की, माझं आयुष्य मी स्वाभिमानाने जगते. महिला म्हणून आपण रडत बसावं असं वाटत नाही. प्रत्येक गोष्टी सहन करण्याची माझी तयारी आहे. मी मेंटली तयार आहे. येणारा प्रत्येक वार झेलायला मी तयार आहे. माझं का खच्चीकरण होईल असं मी काय केलं? माझ्या आयुष्यात एक नाव सोडून दुसरं नाव जोडलं गेलं का? माझं का म्हणून खच्चीकरण होईल? कधी काळी माझ्या आयुष्याचा एक जोडीदार म्हणून जगलेला माणूस, ज्याच्यापासून मी अनेक वर्ष विभक्त राहते, माझं वेगळं आयुष्य जगते. त्यांच्या जाण्या-येण्याने माझ्या आयुष्यावर परिणाम होतो असं मी का मानावं? किंबहुना मी आता त्यांना माझा मित्र हितचिंतक मानत नसेल तर शत्रू का मानावं? हा मुद्दाच असू शकत नाही, असे विधान त्यांनी वाघमारे यांना उद्देशून केले आहे.

Yamini Jadhav : प्रचाराला कमी दिवस असले तरी आम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या दृष्टीकोनातून लोकांपर्यंत पोहचलेलो आहोत

सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या सूचना

सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Lottery: मनमाडमधील ग्राहकाने जिंकली ७ लाख रुपयांची लॉटरी

Varsha Gaikwad : जनता जाणतेय यावेळेला महाविकास आघाडीला निवडून द्यायचं आहे