राजकारण

आव्हाडांच्या बॉडीगार्डची आत्महत्या; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा, आणखी एक सुशांत सिंह राजपूत...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे सुरक्षा रक्षक वैभव कदम यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेले काही दिवसांपासून करमुसे मारहाण प्रकरणात त्यांची चौकशी सुरू होती. दरम्यान, याप्रकरणी भाजप नेते मोहित कंबोज यांनी धक्कादायक आरोप केले आहेत. वैभव कदम यांची हत्या झाल्याचा दावा करत कंबोज यांनी जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला आहे.

मोहित कंबोज यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत मोठा आरोप केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल वैभव कदम यांची हत्या झाली आहे. करमुसे प्रकरणात आधी आरोपी असणारा आणि आता माफीचा साक्षीदार बनायची तयारी दर्शवलेल्या वैभव कदमचा मृतदेह सापडला.

वैभव कदम हा माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा सुरक्षारक्षक होता. एवढ्या मोठ्या हायप्रोफाईल प्रकरणातील आरोपीचा संशयास्पद मृत्यू होतो. राज्यात अजून एक मनसुख हिरेन आणि सुशांत सिंग राजपूतसारखे प्रकरण झाल्याचा आरोपही मोहित कंबोज यांनी केला. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणात लक्ष घालून तात्काळ एफआयआर दाखल करावी, अशीही विनंती त्यांनी केली आहे.

नेमके काय आहे अनंत करमुसे प्रकरण?

फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी उचलून नेऊन मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर तरुणाने केला होता. यावेळी स्वत: जितेंद्र आव्हाडही त्याठिकाणी उपस्थित होते, असाही दावा त्या तरुणाने केला होता. नंतर या प्रकरणाचे मोठे राजकीय पडसाद उमटले होते.

...म्हणून १९९९ ला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Nilesh Rane On Vinayak Raut: माजी खासदार निलेश राणेंची विनायक राऊतांवर टीका

महायुतीसह मविआमध्ये उमेदवारी अर्जासाठी लगबग

Shrikant Shinde: "राज ठाकरेंचे विचार हे शिवसेनेचे विचार"

काँग्रेसमध्ये नाराज असलेले काँग्रेस नेते आबा बागुल आजपासून रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारात सक्रिय