अमरावतीच्या दर्यापूर विधानसभेत नवनीत राणा आणि आनंदराव अडसूळ पिता-पुत्रांमध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. रमेश बूंदीलेंसाठी नवनीत राणा प्रचारसभांमध्ये आक्रमक टीका करत आहेत.
दौंडचे माजी आमदार रमेश थोरात सुप्रिया सुळेंच्या भेटीला बारामतीत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रमेश थोरात आता हाती तुतारी घेणार यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला 'मातोश्री'वर दाखल झाले आहेत मविआमधील जागा वाटपासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ते आता मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करण्यासाठी आता दाखल होणार आहेत.