राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही.
आज राज्यात अनेक पक्षांचे दसरा मेळावे पार पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर दसऱ्याला शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो. आज शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा दसरा मेळावा नेस्को येथे पार पडत आहे.
शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शेतकऱ्याच्या मदतीसाठी थेट बांधावर पोहोचले आहेत. 50 ट्रक भरुन जीवनावश्यक साहित्याच वाटपं एकनाथ शिंदे यांनी केलं.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, अनेक शेतकऱ्यांची जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक्स अकाउंट रविवारी सकाळी काही काळासाठी हॅक झाल्याची घटना घडली. हॅकर्सनी त्यांच्या हँडलवरून पाकिस्तान व तुर्कीचे झेंडे दर्शविणारी पोस्ट टाकली.
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला.