ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून ललितला संरक्षण देणाऱ्या मंत्र्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरवात होत असून, पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे स्टेथोस्कोप आणि एप्रन घालून डॉक्टरांच्या वेशभूषेत विधानभवनात पोहचले आहेत.