राजकारण

सावरकर व्हायची तुमची औकात नाही; फडणवीसांचा राहुल गांधींवर घणाघात

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कल्पना नलसकर | नागपूर : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी माफी मागायला माझं नाव सावरकर नाही, गांधी आहे, असे विधान केले होते. यावरुन राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. यानंतर आता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरकर मुद्द्यावर आक्रमक होत राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. सावरकर व्हायची तुमची औकातही नाही. मी सावरकर नाही हे सत्य बोलता त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो, अशा शब्दात फडणवीसांनी टीकास्त्र सोडले आहे. ते एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.

राहुल गांधी यांचे आभार मानले पाहिजे ज्या ज्या वेळी सावरकरांचा समाजाला विसर पडतोय की काय असं वाटतं. त्याचवेळी राहुल गांधी सावरकांचा उल्लेख करतो. आणि संपूर्ण समाज पेटून उठतो आणि सावरकरांचा विचार समाजापर्यंत आणि नवीन पिढीपर्यंत पोहोचायचं संधी आपल्याला मिळते. आपला भारतीय समाज हे असा आहे की आव्हान आल्याशिवाय तो पेटून उठत नाही. अशा प्रकारचा आव्हान त्यांनी निर्माण करतात. त्यामुळे संपूर्ण समाजात एक चेतना निर्माण होते. खरं म्हणजे या लेखनाकरता पुस्तकाच्या लेखिका शुभांगी त्यांचे धन्यवाद मानावे की राहुल गांधीचे धन्यवाद मानावे हेच कळत नाही, असा निशाणा फडणवीसांनी राहुल गांधींवर साधला आहे.

जेव्हा जेव्हा राहुल गांधी म्हणतात की मी सावरकर नाही. तेव्हा तेव्हा वाटतं की सावरकर व्हायची तुमची औकातही नाही. नागपुरात अवकात म्हणजे क्षमता असते. नागपूरकरांना ते समजतं. सावरकर म्हणण्याची तुमची औकात म्हणजे क्षमता नाही. सोन्याचा चम्मच घेऊन जन्माला आले आहात, अशी टीका त्यांनी केली आहे.

सावरकर त्या छोट्याशा खोलीत राहत असताना त्यांना शौचालयाची व्यवस्था नव्हती जिथे कोणतीही व्यवस्था नसताना तिथे त्यांना महाकाव्य सुचलं त्यांची क्षमता काय आहे हे यावरून कळत. अनेक यातना सहन करता त्यांनी हजारो स्वातंत्र्यवीर तयार केले. विचार करा एकाच कारागृहामध्ये दोन भाऊ आहे भेटत नाहीये कधीतरी भेटू त्या नजरेने एकमेकांशी बोलतात. तरीदेखील त्यांच्या देशभक्ती कशा प्रकारचे आहे. हजारो लाखो देशभक्त तयार करण्याचे काम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं. राहुल गांधी तुम्ही जन्मात सावरकर होऊ शकत नाही. तुम्ही सावरकरांच्या केसाचीही बरोबरी करू शकत नाही. मी सावरकर नाही हे सत्य बोलता त्याबद्दल मी तुमच्या आभार मानतो, असे फडणवीसांनी म्हंटले आहे.

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा

"३७० कलम हटवलं पण दहशतवाद अजून संपला नाही", सांगलीच्या सभेत आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“..तर पुढच्या वेळी आम्हाला काळे झेंडे दाखवा”, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भोरच्या सभेत स्पष्टच सांगितलं

'अजितदादांना 4 जूनला मिशा काढाव्या लागतील' अजितदादांच धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांची खरमरीत टीका