आता शाळांमध्ये केवळ राष्ट्रगीत गाणेच नाही, तर 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे राज्यगीतही सक्तीने गायले जाणार, असा इशारा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिला आहे.
अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने अभ्यासक्रम देऊ, असे आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिले आहे.
सांस्कृतिक कार्य विभागातर्फे यावर्षी देशातील पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व 'महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार 2025' च्या आयोजनाची घोषणा ॲड. आशिष शेलार यांनी केली.